आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल; केंद्र सरकार 20 जुलैला नवा कायदा लागू करणार
महाबुलेटीन नेटवर्क
नवी दिल्ली : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मोदी सरकार नवा कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे. ग्राहक संरक्षण कायदा -2019 (Consumer Protection Act-2019) ला 20 जुलैपासून लागू केले जाणार आहे. नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986 चं स्वरूप आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी ही माहिती दिली आहे. मोदी सरकार येत्या सोमवारी 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा -2019 (Consumer Protection Act-2019) लागू करणार आहे. या नवीन कायद्याची अंमलबजावणी होताच जुन्या कायद्यात नसलेल्या ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.
नवीन कायद्याची ही आहेत वैशिष्ट्ये
—————————— —————–
खाण्या-पिण्यातील भेसळ करणार्या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद
ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील.
ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत.

