Thursday, August 28, 2025
Latest:
इतरखेडपुणे जिल्हापुणे शहर विभागविशेष

अनोळखी व्यक्तीचा विसरलेला मोबाईल चाकणच्या पुजाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवून केला परत…

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील चक्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल मंदिरातील पुजाऱ्याने प्रामाणिकपणाने परत केला आहे. त्या व्यक्तीने या पुजाऱ्याचे कौतुक करून आभार मानले आहे. 

याबाबतची हकीकत अशी की, खराबवाडी ( ता. खेड ) येथील युवक विष्णू मरीबा जगताप ( सध्या रा. नवी सांगवी, पुणे ) हे दुबईला ग्राफिक्स डिझाइनर म्हणून नोकरीस असलेला आपला मित्र रवी घाटे ( मूळ रा. नवी सांगवी, पुणे ) यांस सोबत घेऊन चाकण येथे आपल्या मुलाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महा ई सेवा केंद्रात आले होते. काम उरकल्यावर ते चक्रेश्वर येथे दर्शनासाठी गेले असता रवी घाटे यांचा मोबाईल मंदिर आवारात विसरला. दर्शन झाल्यानंतर दोघेही सांगवीला गेले, अन आपला मोबाईल विसारल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता रिंग वाजत होती, पण कॉल उचलला जात नव्हता. आता आपला मोबाईल मिळणार नाही, अशी त्यांची मनोमन खात्री झाली, पण एकदा जागेवर जाऊन चेक करू, मग पोलिसांत तक्रार देऊ, असे ठरवून ते पुन्हा चाकणला आले. आणि मंदिरात चौकशी केली असता सदर मोबाईल बंडू टंकसाळे या पुजाऱ्याने जपून ठेवला होता, त्यांनी तो घाटे यांना परत केला. दोन्ही मित्रांनी पुजाऱ्याचे आभार मानून कौतुक केले. मात्र तुम्ही कॉल का उचलला नाही, असे विचारले असता पुजारी म्हणाले, अहो तुमचा कॉल यायचा पण त्याला पॅटर्न लॉक होते. त्यामुळे कॉल घेताही येत नव्हता अन तुम्हाला परत कॉल करताही येत नव्हता…यावर सगळ्यांचा एकच हशा झाला…अन हो त्या मित्रांनी दिलेले बक्षीसही पुजाऱ्याने नाकारले..अन आजही माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा मित्रांना प्रत्यय आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!