बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण,नानावटी रुग्णालयात दाखल
महाबुलेटिन नेटवर्क
मुंबई : बॉलिवूडचा शहेनशहा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबई मधील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मी स्वतःला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,’ असे त्यांनी स्वतः ट्विटरवरून कळविले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचे स्वब घेण्यात आले असून अहवाल प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.