आंबेगाव तालुक्यात कोरोना बधितांचा उद्रेक सुरूच
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात आज नव्याने ४८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये मंचर १५, घोडेगाव १, शेवाळवाडी २, अवसरी बुद्रुक १, अवसरी खुर्द ४, पारगाव तर्फे अवसरी ५, गावडेवाडी ३, निरगुडसर १, कळंब २, नांदूर १, निघोटवाडी १, महाळुंगे पडवळ ४, पेठ ४, पिंपळगाव खडकी १, आमोंडी १, चांडोली बुद्रुक १, जारकरवाडी १ या ४८ रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आज ४ कोरोना बधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आज ८५ कोरोना बाधितांची कोरोनातून मुक्तता झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १०८५ झाली असून ६४६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत ३१ कोरोना बधितांचा मृत्यू झाला असून ४०८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.