आळंदीत जोग महाराज पुण्यतिथी साजरी
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्त आळंदीत धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत सप्ताहांतर्गत जोग महाराज पुण्यतिथी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली.
पुण्यतिथीदिनी आळंदी विकास युवा मंचच्या वतीने सदगुरू जोग महाराज मंदिरात सद्गुरू जोग महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ व्यापारी नंदकुमार वडगावकर , संदिप नाईकरे, प्रसाद बोराटे , सुरेश दौंडकर, ज्ञानेश्वर कु-हाडे, .बाळू नेटके, निलेश घुंडरे आदि उपथित होते.
यावर्षी कोरोंना महामारीचे सावटात इंद्रायणी नदी घाटा ऐवजी वारकरी शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत सप्ताहाचे मोजक्याच भाविक, नागरिक, विद्यार्थी यांचे उपस्थितीत पुण्यतिथी सप्ताह व प्रसाद वाटप करण्यात आले.
सद्गुरू जोग महाराज मंदिर मात्र भाविक, नागरिक, वारकरी यांचे दर्शनास खुले न ठेवल्याने आळंदीत व्यवस्थापनाचे कामकाजावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी मंदिरावर विद्युत रोषणाई व पुष्प सजावट देखील करण्यात आली नसल्याने नियोजनात कमतरता राहिल्याची भाविकांमध्ये चर्चा होती.
——