आळंदीत जेष्ठ भाविकास एनडीआरएफ पथकाने वाचविले
आळंदीत जेष्ठ भाविकास एनडीआरएफ पथकाने वाचविले
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील इंद्रायणी नदीत स्नानास गेलेल्या जेष्ठ वारकऱ्याचा नदीत पाय घसरून पडल्याने नदीचे वाहत्या पाण्यात वाहून जात असताना एनडीआरएफच्या रेस्क्यू पथकाने जीव वाचविला. आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असून यात जीवरक्षक नदी घाटावर तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान काल सकाळी साडे दहाचे सुमारास पाऊस सुरू होता. पावसाचे पाण्यासह नदीत इंद्रायणी नदीत धरणातून पाणी पाणी सोडल्याने नदीचे पाण्याची पातळी वाढलेली आहे. जेष्ठ भाविक वारक-याचे नाव रघुनाथ कर्डे ( वय ६५ वर्षे ) बीड जिल्ह्यातील इंजेगाव येथील रहिवासी आहेत.
याबाबत आळंदी पोलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ वारकरी नदीत स्नान करण्यास आले होते. स्नान करताना ते पाय घसरून नदीत पडले. जास्त प्रवाह असल्याने ते नदीत वाहू लागले. हे लक्षात येताच तैनात एनडीआरएफच्या रेस्क्यू पथकाने रघुनाथ कर्डे यांना नदीचे प्रवाहातून वाहत जात असताना वाचवून नदीचे पात्राबाहेर सुरक्षित आणले व त्यांचा जीव वाचविला. यावेळी प्रथमोपचार करून त्यांचे नातेवाईकांच्या कडे सुपूर्द केले. भाविक वारक-याचा एनडीआरएफच्या रेस्क्यू पथकाने जीव वाचविल्याने या पथकाचे परिसरातून कौतुक होत आहे.
००००