आळंदीत अज्ञात तीन जणांचा अकस्मात मृत्यू
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : आळंदी पोलिस ठाण्याचे हद्दीतील आळंदी मधील वेगवेगळ्या तीन घटनांत तीन अज्ञात पुरुषांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.
यामध्ये पहिल्या घटनेत निसार सय्यद यांनी खबर दिली . यात वडगाव चौकातील आर. के. हॉटेल जवळ गर्दी झाल्याने पाहिले असता अनोळखी इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. अज्ञात अनोळखी पुरुषाचे वर्णनात अंगात लाल रंगाचा फूल शर्ट, व निळ्या रंगाची पॅंट घातलेली होती. यावेळी त्यास आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारास २९ मे रोजी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत झाल्याचे घोषित केले. आळंदी पोलिसांनी वैद्यकीय अहवाला नुसार अकस्मात मयत नोंद दाखल केली असल्याची माहिती दिली. अनोळखी मयत पुरुषाच्या नातेवाईकांचा शोध होण्यासाठी पोलिस गॅझेट प्रसिद्धीस मागणी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार आर एम लोणकर करीत आहेत.
दुसर्या घटनेत ८ जुलै २०२० रोजी येथील रहाणार पंकज खैरे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात खबर दिली. आळंदी नगर परिषद मुकादम यांचा फोन आला. गोपाळपुरा येथील तांनाजीनगर मधील सार्वजनिक स्वच्छता गृहाजवळ एक जन बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. त्या प्रमाणे खात्री करून आळंदी पोलिसांत खबर दिली. पोलिस घटना स्थळी येवून पाहणी केली. उपचारास रुग्णवाहिकेतून आळंदी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार पूर्वी मयत घोषित केले. खबरी वरुण अकस्मात अनोळखी मयत दाखल करण्यात आली असून त्याचे नातेवाईकांचा शोध लागला नसल्याने शोध होण्यास पोलिस गॅझेट प्रसिद्धीस मागणी आळंदी पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार आर एम लोणकर करीत आहेत.
तिसर्या घटनेत २९ सप्टेंबर २०२० रोजी अशोक लाड रा.आळंदी देवाची यांनी पोलिसांत खबर दिली. खबर देणार हे इंद्रायणी नदी चे घाटावर असताना दुपारी साडेबारा वाजताचे सुमारास नदीवरील नवीन पुलाजवळ लोकांची गर्दी जमलेली होती. त्यावेळी त्यांनी पाहिले असता नदीचे पाण्यात एक अनोळखी अंदाजे वय ३० ते ३२ असलेला पुरुष नाव,पत्ता माहिती नाही. पालथे स्थितीत दिसला. पोलिसांना जमलेल्या लोकांनी कळविले. पोलिस आले असता खबर देणार व पोलिसांनी पाण्यातील इसमास बाहेर काढून उपचारास आळंदी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेले.यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून उपचारा पूर्वी दीड वाजता मयत घोषित केले. या खबरी वरुण आळंदी पोलिसांनी अकस्मात मयत दाखल केले. अनोळखी मयत नातेवाईकांचा शोध होण्यासाठी पोलिस गॅझेट प्रसिद्धी देण्याची मागणी आळंदी पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार आर.एम लोणकर करीत आहेत.