Saturday, August 30, 2025
Latest:
खेडपुणेविशेष

अखेर टी व्ही सुरू झाला….

 

लाॅक डाऊन काळात दशरथ खाडे या कला शिक्षकाने केला घरच्याघरी टी. व्ही. दुरुस्त

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वाडा : सध्या कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असुन लाॅकडाऊन सुरु झाल्यापासुन विविध क्षेत्रातील नोकरदार
घरात बसुन आहेत. त्याच लॉक डाऊनचा फायदा घेत कलाशिक्षक दशरथ नवसु खाडे यांनी आपला बंद असलेला टि. व्ही. दुरुस्त केला. या जुन्या टि. व्ही.चे जुने किट काढुन नवीन किट बसवुन टि.व्ही. दुरुस्त केला. या मिळालेल्या मोकळया वेळात त्यांनी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला.

तसं दशरथ खाडे यांना १० वी ला असल्यापासुनच इलेकट्राॅनिक साधनांची आवड. त्यांच्याकडे असलेल्या रेडीओचा स्पिकर खराब झाला होता. स्पिकरचा कागदा सारखा असलेला भाग फाटला होता. तो फिटरकडे नेवुन दुरुस्त करायला पाहिजे. त्याचे साहित्य कोठे मिळते याची काहीही कल्पना नव्हती. तरीही त्यांनी वर्तमानपत्राचा कागद घेऊन त्या फाटलेल्या ठिकाणी चिकटविला आणि रेडीओ सुरु केला, तर त्याच्या आवाजात बदल झाला होता. आवाज एकदम चांगला नाही, पण पहिल्या पेक्षा बरा येत होता.

रेडिओच्या कीट मधील असणा-या वेगवेगळया पार्टला काय म्हणतात. त्यांचा उपयोग काय आहे. याची काहीही माहिती नव्हती, तरिही त्या किट मध्ये असणा-या डबी स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने फिरवुन पाहिली तर त्याने रेडिओचे वेगवेगळे केंद्र सेट होतात, अशी माहिती मिळाली. त्यातुनच हळु हळु रेडीओ दुरुस्तीची सुरुवात झाली.

पुणे येथे चित्रकला कॉलेजचे शिक्षण घेत असताना एफ. एम. ला लागणारे सर्व वेगवेगळे साहित्य आणुन एफ. एम. बनवायला सुरुवात केली. काही मित्रांना एफ. एम. बनवुन दिले. पुढे चित्रकला शिक्षकाची नोकरी मिळाली.

सध्या कोरोनाचे रुग्ण वाढतच असुन लॉक डाऊन सुरु झाल्यापासुन मोकळा वेळ मिळत आहे.त्याच वेळेचा दशरथ खाडे यांनी फायदा करुन घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!