अखेर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 13 ऑक्टोबरला निवडणूक, यंदा सरपंचपदासाठी थेट निवडणूक, आचारसंहिता झाली लागू : निवडणूक आयोग
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Elections of Gram Panchayats) जाहीर केल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे सांगितले आहे. या ग्रामपंचायतनिवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदासरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.
# निवडणूक कार्यक्रम कसा असेल ?
- संबंधित तालुक्याचे तहसीलदार 13 सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
- निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील.
- 24 आणि 25 सप्टेंबर रोजी शनिवार–रविवार सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाही.
- प्राप्त अर्जांची छाननी 28 सप्टेंबर रोजी करण्यात येईल.
- 30 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचेही वाटप होईल.
- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
- दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र्रातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी जोरलावणार आहेत. त्यामुळे या निवडणुका चांगल्याच रंगतदार होतील, असा एकंदरीत अंदाज वर्तविला जात आहे.
0000