आळंदीत माऊलींचे पादुकांचे हरिनाम गजरात आगमन ● थोरल्या पादुका मंदिरात स्वागत
आळंदीत माऊलींचे पादुकांचे हरिनाम गजरात आगमन
● थोरल्या पादुका मंदिरात स्वागत
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चल पादुका आषाढी वारी अंतर्गत सोहळ्याचे परंपरेने मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. राज्यात कोरोनाचे प्रादुर्भावाने सलग दुस-या वर्षी पायी वारी सोहळा झाला नाही. मोजक्याच वारकरी यांचे उपस्थितीत बसने यावर्षीचा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट, गोपाळपुर काला उरकून श्रींचे चल पादुका बसने पंढरपूरहुन आळंदीकडे दुपारी तीनच्या सुमारास रवाना झाल्या होत्या. आळंदीत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री हरिनाम गजरात परंपरेने सोहळा विसावला.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर यांनी हातात घेत श्रींचे पादुका घेऊन मंदिरातील कारंजा मंडपात आणल्या. येथे सोहळा आरतीने विसावला. श्रींचे चल पादुका मंगळवार (दि.३) पर्यन्त कारंजा मंडपात ठेवण्यात येणार आहेत. दशमी दिनी मंदिर प्रदक्षिणा त्यानंतर बुधवार (दि.४) आषाढी एकादशी साजरी होणार आहे.
सोहळा आळंदी मंदिरात प्रवेश प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टीळक, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त अँड. विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, लक्ष्मीकांत देशमुख, चक्रांकित महाराज, व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, चोपदार अवधूत रणदिवे, चोपदार राजाभाऊ रंधवे, ज्ञानेश्वर गुळुंजकर यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते. आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका कारंजा मंडपात विराजित करण्यात आल्या. श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला उभे राहून गर्दी केली.
● थोरल्या पादुका येथे सोहळ्याचे स्वागत आरती..
आळंदीत आगमना पूर्वी थोरल्या पादुका मंदिर येथे श्रींचे वैभवी सोहळ्याचे स्वागत ट्रस्टचे वतीने करण्यात आले. श्रींचे चल पादुका सोहळ्याचे स्वागत संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टचे वतीने अध्यक्ष अॅड. विष्णु तापकीर यांचे हस्ते चल पादुका पूजा, श्री माऊली व श्री पांडुरंगरायांची आरती करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पाटील, खजिनदार दत्तात्राय गायकवाड, मनोहर भोसले, हिरामन बुरडे, शांताराम तापकिर, ह.भ.प. रमेश महाराज घोगडे, एकनाथ देवकर, माळवे महाराज यांचे हस्ते मान्यवरांना शाल, उपरणे, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मंदिर व मंदिर परिसरात अनुष्का केदारी यांनी लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट करण्यात आली होती.
● प्रांत विक्रांत चव्हाण यांचे अधिपत्याखाली माऊली चल पादुका आळंदी पंढरपूर आळंदी वारी निर्विघ्नपणे दोन बस मधून परत आळंदीत हरिनाम गजरात सोहळा प्रवेशला.
यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रांत चव्हाण यांनी सुसंवाद साधत इंसिडेंट कमांडर म्हणून उत्तम कामकाज पाहिले.
००००