आळंदी पाणीपुरवठा रॅा वॅाटर यंत्रणेत बिघाड : नगराध्यक्षा उमरगेकर ● जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण मुख्याधिकारी यांचा पाहणी दौरा
आळंदी पाणीपुरवठा रॅा वॅाटर यंत्रणेत बिघाड : नगराध्यक्षा उमरगेकर
जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण मुख्याधिकारी यांचा पाहणी दौरा
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी शहरास पाणी पुरवठा उद्धभव असणार्या इंद्रायणी नदीचे पात्रात पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून पावसाचे पुराचे पाण्यात वाहून आलेल्या जलपर्णीमुळे आळंदी पाणीपुरवठा साठवण बंधाऱ्यातील रॅा वॅाटर विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टीक, जलपर्णी अडकल्याने जलशुद्धीकरणास कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे रॅा वॅाटर यंत्रणेत बिघाड झाल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, विद्युत विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांचेसह विभागातील कर्मचारी यांचे समवेत पाहणी करण्यात आली.
नदीचे पुराचे पाण्यात जलपर्णीसह पाण्यात वाहून आलेला गाळ, प्लास्टीक पाणी साठवण बंधा-यातील विहिरीत सटाला असून या विहीरीतून मिळणारे रॅा वॅाटर जळशुद्धीकरण केंद्रास कमी दाबणे व कमी प्रमाणात मिळत असल्याने जलशुद्धीकरण यंत्रणेवर देखील ताण येत असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. यामुळे आळंदी शहरातील पाणी पुरवठा होण्यासाठीचे जल कुंभ (टाक्या) भरण्यास प्रचंड वेळ लागत आहे. त्यामुळे शहरास अनिश्चित काळासाठी कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा होत आहे. यापुढील पाच ते सात दिवस कमी दाबाने उशिरा पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे. प्रशासनाने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसर करून करावा, असे आवाहन केले आहे.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कामकाज तात्काळ देखभाल दुरूस्ती करण्याचे सूचना नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी पाणी पुरवठा विभागास दिल्या आहेत. आळंदीत सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठा विभागाने काम सुरू केले असल्याची माहिती विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे यांनी सांगितले.
आळंदी पाणी पुरवठ्यास अधिक गती मिळावी यासाठी भामा आसखेड कुरुळी जॅकवेल मधून बंधीस्त पाइप लाइनचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकर काम पूर्ण करण्याचे सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
०००००