आळंदीत सोमवारी दिव्यांगांचे लसीकरण : मुख्याधिकारी जाधव
आळंदीत सोमवारी दिव्यांगांचे लसीकरण : मुख्याधिकारी जाधव
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीत राहणा-या तसेच ज्यांचे वय ४५ वर्ष व त्यावरील आहे अशा सर्व दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण सोमवारी (दि. १४) करण्यात येणार असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशाने ४५ वर्ष वयावरील दिव्यांगांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आळंदीतील दिव्यांग यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. लसीकरण हे राजी शासन व केंद्र सरकार यांचे मार्गदर्शक सूचना व आदेशा प्रमाणे पहिलं व दूसरा डोस या सोमवारी देण्यात येणार आहे. या दरम्यान इतर नागरिकांचे लसीकरण बंद राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
००००