Friday, April 18, 2025
Latest:
उद्योग विश्वखेडदिन विशेषपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रमावळराष्ट्रीयविधायकविशेष

शौर्य दिनानिमित्त शहीद जवानांना केस न्यू हॉलंड आणि एनडीआरएफ यांचेकडून ११११ देशी झाडांचे वृक्षारोपण करून “ग्रीन सॅल्यूट”

शौर्य दिनानिमित्त शहीद जवानांना केस न्यू हॉलंड आणि एनडीआरएफ यांचेकडून ११११ देशी झाडांचे वृक्षारोपण करून “ग्रीन सॅल्यूट”

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर 
चाकण एमआयडीसी : शौर्य दिनाचे औचित्य साधून चाकण एमआयडीसीतील केस न्यू हॉलंड आणि एन डी आर एफ यांच्या संयुक्त विद्यमाने एन डी आर एफ कॅम्प मध्ये ११११ देशी झाडांचे वृक्षारोपण करून ग्रीन सलाम देण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

९ एप्रिल हा भारतीय सैन्य दलामध्ये “शौर्य दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी सन १९६५ मध्ये गुजरात रन ऑफ कच्छ येथील सीआरपीएफच्या सरदार पोस्टवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला व तो हल्ला सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व्ह पुलिस फोर्स) च्या छोट्याश्या तुकडीने परतवून लावत ३४ पाकिस्तानी सैनिकांना मृत्युमुखी पाडले आणि ४ पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडले. जमिनीवर लढल्या गेलेल्या युद्धात हे एकमेव असे युद्ध होते कि, एका छोट्या तुकडीने एवढा मोठा लढा दिला आणि ४ जिवंत सैनिक पकडले गेले. त्याच प्रमाणे या युद्धात ६ बहादूर सैनिकांना वीर मरण आले.

या त्यांनी केलेल्या धाडसाला आणि बलिदानाला चाकण एमआयडीसीतील केस न्यू हॉलंड आणि एन डी आर एफ पुणे यांचेकडून “ग्रीन सॅल्यूट” ठरवण्यात आले. सुदुंबरे जि. पुणे येथील एन. डी. आर. एफ. कॅम्प मध्ये ११११ देशी झाडांचे वृक्षारोपण करून ग्रीन सलाम देण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी एन डी आर एफ 5 वी बटालियन पुणेचे प्रमुख कामांडन्ट श्री. अनुपम श्रीवास्तव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. एनडीआरएफ व आसपासचा एमआयडीसी व आजूबाजूच्या गावांचा संपूर्ण परिसर वृक्षारोपण करून हिरवागार करण्याचा व शौर्यवान, परमवीर, धैर्यवान देशसेवा करणाऱ्या जवानांना ग्रीन सल्युट देण्याचा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी एन डी आर एफ बद्दलची सविस्तर माहिती असिस्टंट कामांडन्ट श्री. कुमार राघवेंद्र यांनी दिली.

ग्रीन सलाम या कार्यक्रमा मध्ये एन डी आर एफ पुणे येथे ५००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल, असे केस न्यू हॉलंड पुणे यांचे संपर्क अधिकारी श्री. शंकर साळुंखे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास एन. डी. आर. एफचे डेप्युटी कामांडन्ट श्री पवन गौड़, डेप्युटी कामांडन्ट श्री. दीपक तिवारी, डेप्युटी कामांडन्ट श्री अनिल तालकोत्रा, असिस्टंट कामांडन्ट श्री. सारंग कुर्वे, असिस्टंट कामांडन्ट श्री शिव कुमार, असिस्टंट कामांडन्ट श्री. कर्मवीर, तर केस न्यू हॉलंड च्या मानव संसाधन विभाग प्रमुख श्रीमती शीतल साळुंके, उत्पादन अधिकारी श्री पवन उप्पल, मानव संसाधन अधिकारी श्री. प्रशांत बेलवटे, तसेच स्पॅक ऑटोमोटिव्ह चाकण चे एच. आर. ऑफिसर श्री. ऋषिकेश दमाने व 5 वी बटालियन, बी 13, व ए/15 वी वाहिनी एनडीआरएफ चे सर्व अधिनस्थ अधिकारी, जवान आदी उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी एन. डी. आर. एफ. चे इन्स्पेक्टर श्री राजेंद्र पाटील, इन्स्पेक्टर श्री. पुरषोत्तम सींग, पीएसआय श्री. ईश्वर मते, पीएसआय श्री. अनंत बाबूलकर, तर निसर्गमित्र श्री धनंजय शेडबाळे यांनी केले. वनराई पुणे आणि निसर्ग राजा मित्र जीवांचे श्री. माणिक व राहुल यांनी सदर उपक्रमास झाडे दिलेबद्दल दोन्ही संस्थांकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!