निधन वार्ता : वसंत सपकाळ
निधन वार्ता : वसंत सपकाळ
महाबुलेटीन न्यूज
पुणे : येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक श्री. वसंत सपकाळ ( वय ५५ वर्षे ) यांचे आज दि.०७-०३-२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यामागे आई, पत्नी, बहीण, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सपकाळ यांचे पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रंथालयांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रात कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. श्री. वसंत सपकाळ साहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली…
● शोकाकुल ●
● सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रंथालय पदाधिकारी
● सहाय्यक संचालक ग्रंथालय कार्यालय, पुणे विभाग
● जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे
● पुणे जिल्हा ग्रंथालय संघ,
● पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका ग्रंथालय संघ