खेड तालुक्याचे सुपुत्र प्राचार्य डॉ. खंडेराव कोतवाल यांचे निधन
खेड तालुक्याचे सुपुत्र, प्राचार्य डॉ. खंडेराव कोतवाल यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील भांबूरवाडीचे सुपुत्र आणि पाचल, ता. राजापूर येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे विद्यमान प्राचार्य डॉ. खंडेराव कोतवाल यांचे नुकतेच हृदयावीकाराच्या तीव्र धक्क्याने कणकवली येथे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते.
कणकवली कॉलेज मध्ये 30 वर्षे अध्यापन करताना ते वाणिज्य विभाग प्रमुख, एन एस एस प्रमुख अशा महत्वाच्या जबाबदारी पार पाडत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी पोहोचले होते. तेथून सेवानिवृत्त झाल्यावर पाचल महाविद्यालयात ते गेली तीन वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. कणकवली शहरांतील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते सदैव अग्रेसर असत. एक विद्यार्थी प्रिय आणि कुशल शिक्षक असा त्यांचा लौकिक होता.
त्यांच्या पश्चात आदर्श पदवीधर प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या पत्नी प्रतिभा, मुलगा, मुलगी,जावई असा परिवार आहे. जलसंधारण विभागाच्या कुकडी विभागाचे कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांचे ते मेहुणे होत.