Friday, April 18, 2025
Latest:
खेडनिवडणूकपुणे जिल्हाबारामतीमावळविशेषशिरूर

पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, शिरूर व बारामती या चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडणूक होणार २४ व २५ तारखेला…

पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, शिरूर व बारामती या चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडणूक होणार २४ व २५ तारखेला…

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
पुणे : जिल्ह्यातील खेड, मावळ, शिरूर व बारामती या
चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग आता मोकळा झाला असून येत्या २४ व २५ फेब्रुवारीला प्रथम सभा घेऊन या निवडणुका घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी चार तालुक्यातील सात गावांची याचिका फेटाळून लावल्याने सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

खेड, शिरूर, मावळ व बारामती तालुक्यातील काही गावाने सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बाबत संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पुणे जिल्हाधिकारी यांना संबंधित ग्रामपंचायतीचे म्हणणे ऐकुन निकाल देण्यास सांगितला होता. त्यानुसार संबंधित याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेऊन सर्व याचिका फेटाळून लावल्यामुळे खेड, शिरुर, मावळ आणि बारामती या चार ही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील एकूण ७४६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतरची पहिल्या सभेमध्ये करायच्या सरपंच आणि उपसरपंच निवडीचे अधिकार दिले होते. परंतु खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी, मावळ तालुक्यातील परंदवडी, शिरुर तालुक्यातील शिक्रापूर आमि बारामती तालुक्यातील निंबुत या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत याचिका दाखल केल्याने या तालुक्यातील निवडणुका न घेता १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले होते.

पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, मावळ व बारामती तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या गावनिहाय तारखा पुढीलप्रमाणे :

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!