Saturday, August 30, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापश्चिम महाराष्ट्रपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागमहाराष्ट्रविशेष

निधन वार्ता : सौ. पुष्पावती सोपानराव पवार यांचे निधन

निधन वार्ता : सौ. पुष्पावती सोपानराव पवार यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक, ग्रंथमित्र व टाकळकरवाडी ( ता. खेड ) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सोपानराव पवार यांच्या पत्नी सौ. पुष्पावती सोपानराव पवार यांचे आज ( शुक्रवार  दि. ०५-०२-२०२१ ) रोजी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शनिवारी सकाळी ९ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होणार आहे. 

कै. पुष्पावती पवार यांच्यावर रुग्णालयात शर्थीचे उपचार करण्यात आले, अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने पवार कुटूंबिय तसेच पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते यांच्यावर दु:खाचा प्रचंड आघात झाला आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ति परमेश्वर देवो, त्याचप्रमाणे, कै. सौ. पुष्पावती पवार यांच्या आत्म्यास सद्गती व चिरशांती लाभो, ही भगवंत चरणी प्रार्थना.!!!

*दुःखांकित*
●श्री. हनुमंत ज्ञानोबा देवकर
【 अध्यक्ष खेड तालुका ग्रंथालय संघ 】
●अध्यक्ष/कार्यवाह/सर्व सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ,
●अध्यक्ष/कार्यवाह/सर्व सदस्य, पुणे विभाग ग्रंथालय संघ ,
●अध्यक्ष/कार्यवाह/सर्व सदस्य, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ
●अध्यक्ष/सचिव/सर्व सदस्य, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका ग्रंथालय संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!