पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी…
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
पिंपरी : ‘आयर्न मॅन किताब’ पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरी मधील ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव श्री. अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते श्री. कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ब्रिटीश संसदचे सदस्य श्री. वीरेंद्र शर्मा, श्री. आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील ॲड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.