खेड तालुक्याचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्यातील कडाचीवाडीचे सुपुत्र व गोंदिया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी राहुल हरिश्चंद्र खांडेभराड ( वय 40 वर्षे ) यांचे शुक्रवारी ( दि. 15 जानेवारी ) रात्री 9.30. वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मागील अडीच महिन्यांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. तेंव्हापासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल त्यांच्यावर काळाने अचानक घाला घातला.
त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज ( दि. 16 ) दुपारी साडेतीन च्या सुमारास चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे.