पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खराबवाडी शाळेचे घवघवीत यश
महाबुलेटीन न्यूज
चाकण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इ. ५ वी व इ. ८ वी साठी फेब्रुवारी २०२० मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. तिचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात खराबवाडी शाळेच्या ओंकार चिलप (२५४ गुण), हुसेन शेख (२४४ गुण), अथर्व कदम (२४२ गुण), श्रावणी भुकन (२२६ गुण) ह्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवंत यादीत आपले स्थान प्राप्त केले.
या यशासाठी शाळेतील सविता भुजबळ मॅडम व साधना घाटकर मॅडम यांनी वर्षभर खूप कष्ट करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अभ्यास घेतला. शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापिका सौ. आशा जाधव मॅडम यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका यांना वर्षभर सहकार्य केले व यशाबद्दल अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. माधुरीताई खराबी यांनी मुलांचे कौतुक केले. महाळुंग इंगळे केंद्रप्रमुख सौ. सुगंधा भगत मॅडम यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे साहेब यांनी गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व तालुकास्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला आहे.