निधन वार्ता : कलावती लांडगे
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
भोसरी : भोसरीतील इंद्रायणीनगर येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील सौ. कलावती सुरेश लांडगे ( वय ६० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्यामागे पती, तीन मुलगे, सुना, दीर, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी सुरेश लांडगे यांच्या त्या पत्नी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम लांडगे गुरुजी यांच्या त्या भावजय, उद्योजक दीपक लांडगे, संगणक अभियंता किरण लांडगे, विजय लांडगे यांच्या त्या मातोश्री, तर सामाजिक कार्यकर्ते सुधीर लांडगे व स्वप्नील लांडगे यांच्या त्या चुलती होत.