भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना : इमारतीच्या टेरेसवर खेळताना पाचव्या मजल्यावरून पडून एक मुलगी जागीच ठार, तर एक मुलगी गंभीर जखमी
काळेवाडी येथील दुर्दैवी घटना, भाऊबीजेच्या दिवशी नढेनगरवर शोककळा
महाबुलेटीन न्यूज : सोमनाथ नढे
पिंपरी चिंचवड : इमारतीच्या टेरेसवर मैत्रिणी खेळताना पाचव्या मजल्यावरून खाली पडून एक मुलगी जागीच ठार झाली असून एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी ( दि. १६ नोव्हेंबर ) सायंकाळी ६ च्या सुमारास काळेवाडी येथील गणेश वंदना सोसायटीत घडली. सोसायटीच्या टेरेसवर खेळत असताना कुजलेले प्लायवुड तुटुन कु. नंदिनी अनिल म्हेत्रे ( वय वर्षे १२) व कु. धनश्री कदम ( वय वर्षे १२, दोघी रा. नढेनगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे ) ह्या दोन्ही मैत्रिणी पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या. त्यामध्ये नंदिनी म्हेत्रे हीचा जागीच मृत्यू झाला असुन धनश्री कदम ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर आकुर्डी येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. सदर घटनेचा तपास वाकड पोलिस करत आहेत.