दगडू नारायण खराबी यांचे निधन
दगडू नारायण खराबी यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील प्रगतशील शेतकरी व जुन्या पिढीतील ग्रामपंचायत कर्मचारी दगडू नारायण खराबी ( वय ९५ ) यांचे शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी माणिक खराबी, ग्रामपंचायत कर्मचारी व उद्योजक सुनील खराबी व शैला सहादू साठे यांचे ते वडील, तर युवा कार्यकर्ते वामन खराबी, राजेंद्र खराबी, प्रताप ( पप्पू ) खराबी, अशोक खराबी, गौरव खराबी यांचे ते आजोबा होत.