चाकणचा गोल्डमॅन हरपला : गोल्डमॅन दिलीपशेठ जाधव यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील प्रसिध्द गोल्डमॅन, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व नाणेकरवाडी तंटामुक्ती समितीचे माजी उपाध्यक्ष दिलीपशेठ बबनराव जाधव ( वय ५५ ) यांचे गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, बहिणी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच शांताराम जाधव यांचे ते धाकटे बंधू, पंचायत समिती सदस्या वैशालीताई गणेश जाधव यांचे ते धाकटे सासरे, तर सामाजिक कार्यकर्ते किशोर नाणेकर यांचे ते सासरे होत.