Monday, September 1, 2025
Latest:
इतरपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

शुभमंगल सावधान….! लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास आता मिळणार विमा कवच

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :

लग्न हा गरीब व श्रीमंत अशा दोन्ही वर्गासाठीच खर्चिक सोहळा असतो. अनेकजण आयुष्यभराची कमाई यामध्ये खर्च करतात. मंगल कार्यालय, डेकोरेशन, केटरिंग अशा अनेक गोष्टींवर लग्नामध्ये सढळ हाताने पैसा खर्च होतो. अशावेळेस दुर्दैवाने लग्न मोडले, तर मानसिक आघातासोबतच आर्थिक फटकाही सहन करावा लागतो, परंतु आता या खर्चिक सोहळ्याला विमा कवच देणे शक्य झाले आहे. लग्नाआधी नवरी किंवा नवरा पळून गेल्यास किंवा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लग्न मोडल्यास विमा कंपनी याला इन्शुरन्स कव्हर देते.

इन्शुरन्स जाणणारा आणि त्याची खरेदी करणारा मोठा जागरूक ग्राहक वर्ग आपल्याकडे आहे. विम्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. काही विमा कंपन्या एका अनोख्या परिस्थितीसाठी देखील विमा ऑफर करत आहेत. काही विमा कंपन्या लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास विमा देत आहेत. या प्रकारच्या विम्याला वेडिंग इन्शुरन्स (wedding insurance policy) म्हणतात. वाचायला जरी हे गमतीशीर वाटत असले, तरी याला बऱ्यापैकी मागणीही असल्याचे समोर येत आहे.

Wedding insurance policy जाणून घ्या
———————–
लग्नासाठी देखील अनेक कंपन्यांनी इन्शुरन्स पॉलिसी बनवली आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीचे पॅकेज घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार या पॅकेजची निवड करता येते. या पॅकेजअंतर्गत मिळणारे अनेक लाभ तुम्हाला घेता येतात. इन्शुरन्स ब्रोकिंग साईटवर वेडिंग इन्शुरन्सचे अनेक पर्यायब्ध आहेत.

 

वेडिंग इन्शुरन्स का आवश्यक आहे ?
—————–
लग्नासाठी मोठा खर्च केला जातो. यामध्ये अनेक गोष्टी असतात. हॉल किवा रिसॉर्टच्या अ‍ॅडव्हान्सचा खर्च असतो. यावर इन्शुरन्स मिळतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल एजन्सीला दिलेल्या अ‍ॅडव्हान्स पेमेंटवर, हॉटेलच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंवर, लग्नपत्रिकांचा खर्च, सजावट यावरील खर्चावर इन्शुरन्स असतो.

त्यामुळे लग्न कोणत्याही कारणाने रद्द झाल्यास, दागिने चोरी झाल्यास, अपघात झाल्यास अशा अनेक समस्यांअंतर्गत हा वेडिंग इन्शुरन्स तुमच्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून काम करेल. एका योग्य विमा पॉलिसीअंतर्गत तुम्ही तुमच्या नुकसानाची भरपाई करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!