चाकण येथील ब्रिहंस कंपनीत मनसे कामगार युनियनची स्थापना
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्यावतीने आज ( दि. १० सप्टेंबर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा संघटक अभय वाडेकर याच्या नेतृत्वाखाली चाकण मधील ब्रिहंस लॅबोरेट्रिज प्रा. लि. या कंपनीत मनसे कामगार युनियन स्थापन करण्यात आली. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व योगेश चिल्ले साहेब निशांत गायकवाड याच्या उपस्थितीत कामगार बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी अभय वाडेकर, दत्ता परदेशी, संतोष काळे, विक्रम भालेराव, धोडीभाऊ अंमले, शुभम स्वामी, भानुदास सागर आदी मोठ्या प्रमाणावर मनसे सैनिक उपस्थित होते.