Saturday, April 19, 2025
Latest:
कोरोनाखेडगणेशोत्सवपुणे जिल्हाविशेष

कोरोनाची महामारी, यंदाची वारी घरच्या घरी…

शिवशाहीने पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतानाचा देखावा

महाबुलेटीन न्यूज : शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : यावर्षी देशावर कोरोनाचे संकट आल्याने आळंदी ते पंढरपूरचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला, मात्र वारीचा हाच संदर्भ घेवून पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर येथील नम्रता सुनिल थिगळे या गृहीनीने आपल्या स्मित आणि सौम्य या दोन मुलांच्या मदतीने घरातील गणपती बाप्पा समोर याचा आकर्षक असा देखावा साकार केला होता. कोरोना मुळे ‘यंदाची वारी, घरच्या घरी’ या संकल्पनेतून हा देखावा सादर करण्यात आला होता.

हा देखावा सादर करताना सर्व टाकाऊ वस्तु पासून बनवण्याचा प्रयत्न केला. या देखाव्यात आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवनी समाधी मंदिर तयार करण्यात आले होते. उजव्या बाजूला इंद्रायणी नदीचा घाट त्याप्रमाणे पुढे शिवशाही बसने पादुका या आळंदी कडून पंढरपूरकडे प्रस्थान करतानाचे दृश्य दाखविले होते. तर पालखी सोहळ्या साठी कठोर परिश्रम घेणाऱ्या पोलिस बांधवांचेही या देखाव्यात आकर्षक असे दृश्य साकारण्यात आले होते. पोलीस हे बंदोबस्त करताना मास्कचा वापर करत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले होते. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा घरगुती देखावा अवघ्या खेड तालुक्यात कौतुकास पात्र ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!