माऊलींचे पादुका परीसरात फुलझाडांचे रोपण
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : आळंदी वडगांव रस्त्यावरील श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका परीसरात आळंदी जनकल्याण फाऊंडेशन च्या वतीने अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांचे हस्ते फुल झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी पदाधिकारी पत्रकार अर्जुन मेदनकर यांचे हस्ते श्रींचे पादुका पुजन करण्यात आले. या प्रसंगी आळंदी जनहित फाऊंडेशनचे सल्लागार बाळासाहेब पेठकर, सखाराम गवळी यांनी फुल झाडे लावण्यास परीश्रम घेतले. गणेशोत्सवातील उपक्रम म्हणुन श्री माऊलींचे पादुका परीसरात तुळशी रोपे, गुलाब, मोगरा, सोनचाफा, पारीजात व जास्वंदीची रोपे लावण्यात आली. श्रींचे पादुका पुजेसाठी फुले व परीसरात सुगंध दरवळण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रल्हाद भालेकर यांनी सांगितले.
——