कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २० ॲागष्ट २०२० ) धक्कादायक : तालुक्यात आज ५३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २३०२, तिघांचा मृत्यू
कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २० ॲागष्ट २०२० )
धक्कादायक : तालुक्यात आज ५३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २३०२,
आज चाकणला सर्वाधिक १३ रुग्ण, ग्रामीण भागात २३ रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू
१८९१ रुग्ण बरे होऊन गेले घरी
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ५३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात १८९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. चाकणला सर्वाधिक १३ रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात तब्बल २३ रुग्णांची भर पडली आहे. राजगुरूनगर मधील एक व सोळू मधील दोन असा तीन रुग्णांचा रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २३०२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३० ) : राजगुरूनगर – ९, चाकण – १३, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २३ ) : मरकळ ५, मेदनकरवाडी ४, आंबेठाण ३, आखरवाडी २, सोळु २, तर धानोरे, चऱ्होली, निघोजे, किवळे, चांदूस, बहिरवाडी व तोरणे बुद्रुक या ७ गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २३०२
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३४९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १८९१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण १३,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ ( राजगुरूनगर १ : वय ५३, सोळु २ : वय ४० आणि ५४ वर्षे )
——————