स्वातंत्र्यदिन विशेष : काव्यमंच : हवे स्वातंत्र्य अजून
स्वातंत्र्यदिन विशेष : काव्यमंच : हवे स्वातंत्र्य अजून
🇮🇳हवे स्वातंत्र्य अजून🇮🇳
———————————-
आम्हासाठी अनमोल
आला स्वतंत्रता दिन
आम्हासाठी स्वातंत्र्याचा
सण राष्ट्रीय सुदिन॥धृ॥
नाही मिळाले पुरते
पण स्वातंत्र्य अजून
हवे आम्हास स्वातंत्र्य
आज कोरोना पासून ॥१॥
हवे स्वातंत्र्य आणखी
अति आतंका पासून
आम्हा मिळावे स्वातंत्र्य
बलात्कारीं च्या पासून ॥२॥
हवे आम्हास स्वातंत्र्य
अन् बेकारी पासून
मंदी पासून स्वातंत्र्य
हवे आम्हास अजून ॥३॥
बेसुमार महागाई
हवे आणि त्यापासून
भ्रष्टाचार इथे तिथे
हवी मुक्ती त्यापासून ॥४॥
असे स्वातंत्र्य आमुच्या
आहे मनात रुजून
दिन स्वातंत्र्याचा यावा
असे स्वातंत्र्य योजून ॥५॥
— निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
🇮🇳जयहिंद🇮🇳 🇮🇳जयहिंद🇮🇳