Friday, April 18, 2025
Latest:
खेड विभागजुन्नरनागरी समस्यापुणे जिल्हा

हिवरे खुर्द व कारखाना फाटा रस्त्याची डागडुजी सुरू

खासदार डॉ. कोल्हे यांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने केले काम सुरू
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी 
नारायणगाव : ओतूर-ओझर-नारायणगाव रस्त्यावरील हिवरे खुर्द व कारखाना फाटा रस्त्याच्या दुरावस्थेची तत्काळ दखल घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
नारायणगाव-ओतूर रस्त्यावरील हिवरे खुर्द, कारखाना फाटा या रस्त्याचे काम  वन विभागाशी संबंधित असल्याने कि. मी. ६१.२०० ते कि.मी.८१.७०० दरम्यानचे काम रखडले आहे, तर कि. मी.७६.१०० ते कि. मी. ६८.३०० या लांबीत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्याने रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. या संदर्भात डॉ. कोल्हे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी वन विभाग व उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ( हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल ) यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना दिली.
या प्रस्तावांवर निर्णय होईपर्यंत वेळ लागणार असल्याने या ठिकाणी तातडीने खड्डे भरुन रस्ता दुरुस्त करण्याची सूचना डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. नागरिकांना वाहने चालवताना होणारा त्रास व खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. कोल्हे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आज ( दि. ६ ऑगस्ट ) रोजी सकाळीच खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली.
या संदर्भात आपण लवकरच वनविभागाशी चर्चा करणार असून आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांशीही चर्चा करून प्रलंबित राहिलेले रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!