Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनापुणेविशेष

ससूनमध्ये ३२५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध करणार : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

महाबुलेटीन न्यूज / विशेष प्रतिनिधी
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त
३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. आज ( दि. २ ) जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची पहाणी केली.
यामध्ये ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी कामे तातडीने करण्यात येत आहेत. पहाणीच्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, विभाग प्रमुख प्रा. आरती किनीकर, कार्यकारी अभियंता तेलंग यांच्या सह इतर अधिकारी उपस्थित होते. ससून रुग्णालयात ४ ऑगस्ट पर्यंत १७५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील.
ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
ससून रुग्णालयातील इन्फोसिस, डेव्हीड ससून, पेडियाट्रीक, जेकब ससून या वॉर्डात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामासाठी ४ कोटी २ लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!