बारामती कोरोना अपडेट : रुग्णांची संख्या १२२ वर
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
बारामती : शहरातील उर्वरित तीन अहवाल प्राप्त झाले असून तीन ही अहवाल पॉझिटिव आलेले आहेत. त्यामध्ये जगताप वस्ती पंदरे येथील 56 वर्षांचे पुरुष, ग्रामीण रुग्णालय रूई येथील सफाई कर्मचारी व पाटस रोड येथील एक युवक असे तीन रुग्ण कोरोना पोजेटिव्ह आढळून आल्याने आज दिवसभरात संख्या सात झालेली असून एकूण संख्या १२२ झाली आहे, अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.