‘लाख’ मोलाचे….!
विचार, कृती आणि निकाल या क्रमाने गोष्टी घडतात. अर्थात मार्गावर खाचखळगे असतात. अडथळे असतात. त्या अनुषंगाने मग धडपडणे ओघाने आलेच. टीका आणि कौतुक हेही त्या प्रक्रियेचा भाग. अशीच साधारणपणे वाटचाल ‘महाबुलेटिन’ ची राहिली.
जेमतेम महिना झाला. महाबुलेटिनची सुरुवात झाली. मग मित्र जोडीला उभे राहू लागले. काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष. जणू संघ तयार झाला. म्हणूनच महाबुलेटिन एक टीम तयार झाली. या टीमची सांघिक कामगिरी समोर येऊ लागली. महिनाभरात ‘लाख’भर लोकांपर्यंत पोहचणे, हे या सांघिक कामगिरीचे यश आहे. हे लाख मोलाचे आशीर्वाद महाबुलेटिन टीमसाठी आहेत. हे हुरूप वाढवणारे व ऊर्जा देणारे आहे.
महिन्याचा मागोवा घेताना ‘लाख’ लोकांनी महाबुलेटिनला पाहिले. अभ्यासले. यातील प्रयोग, बातम्या यासंदर्भात हितचिंतकांनी संपर्क करून कौतुक केले. काहींनी सूचना केल्या. काही मित्रांनी कधीकधी आपसात टीकाही केली. या सर्व गोष्टी महाबुलेटिन या लोकाभिमुख व लोकांच्या व्यासपीठाला आवश्यकही होते. त्यामुळे सर्वांचेच आभार व्यक्त करणे महाबुलेटिन टीमचे कर्तव्य आहे.
ब्रेकिंग, जलद, सर्वात पुढे वगैरे महाबुलेटिनसाठी कधीच महत्वाचे नाही. विश्वासार्ह बातम्या, बातम्यांमधील वेगळेपण, मोजकेपणाने मांडणी, बातम्या/ सदर यातील दर्जा यासाठी महाबुलेटिन टीम आग्रही आहे. पत्रकारतेतील दर्जा आणि विश्वास यासाठी महाबुलेटिन टीम कार्यरत आहे. महिन्याभरातील लाख मोलाच्या पाठिंब्यावर आणि सूचना या शिदोरीवर महाबुलेटिन टीम कार्यरत राहील. लाखांचा आकडा आमच्यासाठी मोलाचा आणि ऊर्जा देणारा आहे. यापुढेही सूचनांचे स्वागत आहे. आशीर्वाद देणाऱ्या हितचिंतकांचे ऋण आणि टीका करणाऱ्यांचे महाबुलेटिन टीमकडून आभार. पुढे जाताना महिनाभराचे काम व प्रवास याचे सिंहावलोकन करताना केलेला हा शब्द प्रपंच.
निपक्ष बातम्या आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा