सांगुर्डीगाव पानंद रस्त्याचे पालटले रुप

चाकण : गेली अनेक वर्षे सतत पावसाळ्याच्या कालखंडात गावातील अनेक शेतकरी, नागरिकांना शेतीची कामे करताना आपले पशुधन सांभाळताना अनेक अडचणीशी सामना करावा लागत असे. परिणामी सतत पडणार्या पावसामुळे प्रचंड चिखल तुडवणे परिसरातील अनेक शेतकर्याच्या नशिबी होते.
तुकोबांच्या वाणीनुसार ‘असाध्य ते साध्य। करिसी सायास, अभ्यासाकारणे तुका म्हणे’।। या उक्तीप्रमाणे गावातील अनेक युवक, शेतकरी तसेच सांगूर्डी ( ता. खेड ) ग्रामपंचायतच्या सहकार्यातून पुढाकार घेत. कृष्णकमल हौसिंग सोसायटी ते गावच्या दक्षिण बाजूस असलेले कडजाई परिसरातील ओढ्यापर्यत सुमारे दिड कि. मी. रस्त्याचे रुंदीकरण असे मुरमीकरणाचे काम संपन्न झाले.
सदरचे कामकाज करणेकामी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा चिटणीस वसंतराव भसे यांचे सौजन्य लाभले. या कार्यासाठी सांगुर्डी गावातील ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, शेखर भसे, विकास भसे, माजी उपसरपंच अंकुश भसे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष भसे, गणेश भसे, अनिल भसे, सचिन लिंभोरे, नारायण भसे, आनंदा भसे, चंद्रकांत भसे, संजय भसे, सागर भसे, राहुल भसे, वृदांवन भसे, रामभाऊ भसे, संदीप भसे, अनेक युवक कार्यकर्ते ३ दिवस जे. सी. बी., ट्रॅक्टर, हायवा, रोलर यंञाद्वारे काम करीत असल्याने सर्वांनी दळणवळणाच्या दृष्टीकोनातुन समाधान व्यक्त केले.