खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून स्वामी, बागवान कुटुंबियांचे सांत्वन


महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ( दि.१८ जुलै ) अलंकार ग्रुप ऑफ इंदापूरचे संस्थापक व इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत हाजी तय्यबभाई इमामभाई बागवान व श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिवंगत श्रीकांत स्वामी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नगरसेवक पोपट शिंदे, स्विकृत नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा. अशोक मखरे, अपंग हक्क परिषदेचे सागर मिसाळ हे त्यांच्या समवेत होते.
हाजी तय्यबभाई इमामभाई बागवान पंधरा वर्षे इंदापूरचे नगरसेवक होते. प्रगतशील शेतकरी, उद्योजक म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. तर श्रीकांत स्वामी हे श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते होते.