काळेवाडी मध्ये आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी औषधांचे वाटप, २० हजार कुटुंबीयांनी घेतला लाभ

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे नगरसेवक विनोद जयवंत नढे यांच्या वतीने काळेवाडी मध्ये २० हजार कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषध विनामूल्य स्वखर्चाने वाटप करण्यात आले आहे.
मंगळवार ( दि. १४ जुलै ) पासुन सुरु झालेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक विनोद नढे व विनोदभाऊ नढे युवा मंचच्या वतीने काळेवाडी मध्ये होत असलेल्या कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता डाॅ. रोहित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे होमिओपॅथी औषध वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर नगरसेवक विनोद नढे यांनी नागरिक, व्यापारी व कामगार वर्गास लाॅकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे.