शरद पवार साहेबांनी केले दत्ताकाकांच्या कुटुंबियांचे सांत्वन
मा. आमदार विलास लांडे आणि कुटुंबियांचेही केले सांत्वन
महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मागील आठवड्यात दत्ताकाकांचे कोरोनामुळे निधन झाल्याने पिंपरी-चिंचवड सह पुणे जिल्ह्यात दुःखाचे सावट पसरले असून काकांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी संपर्क केला आहे. आज पवार साहेबांनी काकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आस्थेने विचारपूस करून सांत्वन केले. तसेच कार्यकर्त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत सूचना केल्या. या वयातही पवार साहेबांनी धाडसाने काकांच्या घरी जाऊन सांत्वन केल्याने कार्यकर्ते अक्षरशः गहिवरून गेले. यावरून ते कार्यकर्त्यांना किती जपतात, याचा कार्यकर्त्यांना प्रत्यय आला. तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या आई वडिलांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्याही घरी जाऊन साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी बिर्ला हॉस्पिटलच्या तक्रारी करून हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी केली.