लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर कडून या “कोरोना वॉरियर्स” चा सन्मान

राजगुरूनगर : कोरोनाच्या साथीत धोक्याचा संभव असूनही आपल्या जीवाची परवा न करता राजगुरूनगर शहर व खेड तालुक्यात अविरत काम करणाऱ्या योद्धांचा सन्मान लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-D2 राजगुरूनगर शाखेच्या वतीने करण्यात आला.
पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, खेड पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरविंद चौधरी, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.दीपक मुंढे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ गोरे ह्यांचा सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर नगरपरिषदेचे कर्मचारी कैलास सांडभोर ह्यांनी कोरोना लढ्यात केलेल्या विशेष कामगिरी बद्द्ल त्यांचा ही सन्मान करण्यात आला. सन्मान देताना पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती भगवान पोखरकर, नगरसेवक शंकर राक्षे, संतोष सांडभोर आदी उपस्थित होते.
तसेच क्लबचे नूतन अध्यक्ष कृणाल रावळ, माजी अध्यक्ष मिलिंद आहेर, सचिव अंबर वाळुंज, खजिनदार नितीन दोंदेकर, अमित टाकळकर, इम्रान मोमीन, रमेश बोऱ्हाडे, डॉ. सागर गुगलिया, डॉ. विजय आंबरे, मनीष बोरा, विजय घोरपडे हे उपस्थित होते. क्लबने यंदा चौथ्या वर्षात पदार्पण केले असून राजगुरूनगर व परिसरातील भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असल्याची माहिती क्लबचे सचिव अंबर वाळुंज यांनी दिली.