Thursday, August 28, 2025
Latest:
कृषीखरेदी-विक्री

चाकण बाजारात बटाटा, हिरवी मिरची व कोबीचे भाव कडाडले, लसणाची आवक घटूनही भावात घट, कांद्याची आवक वाढल्याने भाव गडगडले, एकूण उलाढाल ७ कोटी, ६० लाख रुपये

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
चाकण :
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बटाटा, हिरवी मिरची व कोबीचे भाव कडाडले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने भाव गडगडले. बटाट्याची आवक वाढूनही भावात उच्चांकी वाढ झाली. लसणाची आवक घटूनही भावात घट झाली.

फळभाज्यांच्या बाजारात टोमाटो, कोबी, वाटाणा व गाजराची किरकोळ आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गाईची संख्या घटूनही भाव स्थिर राहिले. बैल, म्हैस व शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत वाढ झाल्याने भाव स्थिर राहिले. बाजारात एकूण ७ कोटी ६० लाख रुपये उलाढाल झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २० हजार ५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून १,७०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ७५० क्विंटलने वाढूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून २,२०० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगा व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३ क्विंटलने घटूनही भावात १ हजार रुपयांची घसरण झाली. लसणाचा कमाल भाव १७ हजार रुपयांवरून १६ हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६५ क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

* शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :–
कांदा – एकूण आवक – २०,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,७०० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.

बटाटा – एकूण आवक – १,७५० क्विंटल. भाव क्रमांक १. २,२०० रुपये, भाव क्रमांक २. १,६०० रुपये, भाव क्रमांक ३. १,४०० रुपये.

* फळभाज्या :-
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे :-
टोमॅटो – २९० क्विंटल ( १,००० ते १,५०० रू. ), कोबी – १८० क्विंटल ( १,४०० ते १,६०० रू.), फ्लॉवर – २१० क्विंटल ( ९०० ते १,२०० रु.), वांगी – ६६ क्विंटल ( २,००० ते ३,००० रु.), भेंडी – ८३ क्विंटल ( ३,००० ते ४,००० रु.), दोडका – ६४ क्विंटल ( ४,००० ते ५,००० रु.), कारली – ७६ क्विंटल ( ३,००० ते ४,५०० रु.), दुधीभोपळा – ६२ क्विंटल ( १,००० ते २,००० रु.), काकडी – ९२ क्विंटल ( १,००० ते २,००० रु.), फरशी – ४३ क्विंटल ( ३,००० ते ५,००० रु.), वालवड – ४७ क्विंटल ( ३,००० ते ५,००० रुपये), गवार – ४२ क्विंटल ( ५,००० ते ७,००० रुपये, ), ढोबळी मिरची – १७० क्विंटल ( ३,००० ते ५,००० रु.), चवळी – ३४ क्विंटल ( २,००० ते ३,००० रु.), वाटाणा – १९० क्विंटल ( ५,००० ते ६,००० रु.), शेवगा – ५३ क्विंटल ( ३,००० ते ४,००० रु.), गाजर – २०० क्विंटल ( १,५०० ते २,००० रु.),.

* पालेभाज्या :-
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : –
मेथी – एकूण १० हजार १०० जुड्या ( १,२०० ते १,७०० रुपये,), कोथिंबीर – एकूण २१ हजार २०० जुड्या ( ८०० ते १,२०० रुपये,), शेपू – एकूण २ हजार ३०० जुड्या ( ८०० ते १,००० रुपये ), पालक – एकूण ३ हजार ४०० जुड्या ( ७०० ते १,००० रुपये),.

* जनावरे :-
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४५ जर्शी गाईपैकी ४२ गाईची विक्री झाली. ( १५,००० ते ७०,००० रु.), १३० बैलांपैकी ९० बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रु.), १९० म्हशीपैकी १७० म्हशींची विक्री झाली.( ३०,००० ते ८०,००० रु.), १० हजार ८०० शेळ्या – मेंढ्यापैकी १०,४५० शेळ्यांची विक्री झाली. ( २,००० ते २५,००० रु.).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!