Thursday, April 17, 2025
Latest:
खेडधार्मिकपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविधायकविशेषसामाजिक

‘अस्थी व रक्षा विसर्जनातून वृक्षसंवर्धन… वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण… व दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचे जतन…’ निघोजे गावात मुलाच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी आई व कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले ४७ झाडांचे वृक्षारोपण, माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांच्या कुटुंबाचा व ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

अस्थी रक्षा विसर्जनातून वृक्षसंवर्धन
          वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचे रक्षण
                     दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीचे जतन…’
निघोजे गावात मुलाच्या निधनानंतर स्मृती जतन करण्यासाठी आई व  कुटुंबीयांनी खड्ड्यात अस्थी टाकून केले ४७ झाडांचे  वृक्षारोपण,
माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांच्या कुटुंबाचा ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

महाबुलेटीन न्यूज

चाकण एमआयडीसी : पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिलाताई सोपान शिंदे यांचे चिरंजीव खेड तालुक्यातील निघोजे गावच्या माजी सरपंच कांचनताई शिंदे यांचे पती, चाकण उद्योग नगरीचे युवा उद्योजक आणि भैरवनाथ लॉजिस्टिक उद्योग समूहाचे संचालक, कामगार नेते कै. संतोषभाऊ सोपान शिंदे ( वय ४७ वर्षे ) यांचे बुधवार ( दि. १६ नोव्हेंबर २०२२ ) रोजी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या संकल्पनेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी अस्थी विसर्जन नदीपात्रात करता त्यांच्या वयाइतकी ४७ झाडे लावून त्यांच्या स्मृतींचे जतन केले. गावातील व्यक्तीच्या निधनानंतर ‘स्मृती वृक्ष’ लावण्याचा स्तुत्य निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

यावेळी त्यांच्या आई माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे, पत्नी माजी सरपंच कांचनताई शिंदे, मुलगा कु. ओम, मुलगी, भाऊ, हिरामण शिंदे, निवृत्ती शिंदे, गणपतराव शिंदे, धनंजय मोरे, नामदेव शिंदे, कैलास येळवंडे आबू येळवंडे, बाळू शिंदे, किरण पानसरे, संतोष येळवंडे, सागर येळवंडे, रमेश खाडेभराड, विजय येळवंडे, प्रमोद कोळेकर, तानाजी शिंदे, सुदाम आरूडे, विग्नेश्वर येळवंडे, अशोक येळवंडे, भोर मामा, संभाजी शिदे, जालिंदर नाणेकर, ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!