Sunday, April 20, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाबँकिंगविशेष

महिला बचत गटांना व्याजदरात विशेष सूट : वाघमारे

खराबवाडीत जिल्हा बँक, नाबार्ड यशवंतराव सेंटर चव्हाण सेंटर यांच्या वतीनेआर्थिक डिजिटल साक्षरता अभियानसंपन्न,
महिला बचत गटांना व्याजदरात विशेष सूट : वाघमारे

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर

चाकण : नियमित अर्थसहाय्य परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून टक्क्याहून केवळ ४ टक्के व्याजदराने अर्थसहाय्य दिले जाते. बचत गटांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे विकास अधिकारी आर.एस. वाघमारेयांनी केले.

राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक ( नाबार्ड ), पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्तविद्यमाने खराबवाडी ( ता. खेड ) येथे बँकेचे विद्यमान संचालक आमदार दिलीपराव मोहिते झोनल अधिकारी विकास भास्कर यांच्यामार्गदर्शनाखालीआर्थिक डिजिटल साक्षरता अभियानसंपन्न झाले, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी वाघमारे यांनी आरटीजीएस, एनईएफटी, एनी ब्रँच बँकिंग, कॉमर्स, आर्थिक साक्षरता, आर्थिक नियोजन, आवश्यक व अनावश्यक खर्च, विमा, कर्ज, बचत खाते, मुदत ठेवी, एटीएम सुविधा, बचतीचे महत्व, बँकेचे व्यवहार, प्रधानमंत्री जनधन योजना, विमासंरक्षण, निवृत्ती वेतन, किसान क्रेडिट कार्ड ( पीककर्ज ), महिला बचत गटांसाठी सोयीसुविधा, कुक्कुटपालन, गायम्हैसशेळीपालन, मत्स्यपालन यासाठी शेतीपूरक कर्ज आदींची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा बँकेचे विकास अधिकारी आर. एस. वाघमारे, शाखा व्यवस्थापक व्ही. एम. वाडेकर, महिला अत्याचार तक्रार समितीच्या केंद्रीय सदस्या मंगलताई देवकर, दत्तात्रय बोत्रे, योगेश बवले, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, भैरवनाथ सोसायटीचे संचालक तानाजी खराबी, मच्छिन्द्र कड, अमृता खराबी, ज्ञानेश्वर कड, अर्जुन कड, नवनाथ कड, रामचंद्र खराबी, सचिव रोहिदास गव्हाणे, सुभाष खराबी, विशाल खराबी, सोनल कड, ज्योतीकड, मनीषा सावंत, बचत गटाच्या महिला, शेतकरी आदी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!