मोठी दुःखद बातमी : Vinayak Mete Accident: शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मराठाआरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
मोठी दुःखद बातमी : Vinayak Mete Accident: शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मराठाआरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
महाबुलेटीन न्यूज
मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगतीमहामार्गावर माडुप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अपयश आले आणि त्यांनी रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
आज पहाटे मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. तब्बल एक तास त्यांनी मदतीसीठी प्रयत्न केला मात्र त्यांच्यापर्यंत मदत पोहचली नाही. आणि त्यानंतर कार चालकाच्या मदतीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी मेटे यांना मृत घोषीत केलं.