नुकत्याच जन्मलेल्या नकोशीला गावाच्या बाजुला भरपावसात रस्त्यावर दिलं फेकून…, धक्कादायक प्रकाराने खेड तालुक्यात खळबळ… ग्रामस्थांनी घडविले माणुसकीचे दर्शन…
नुकत्याच जन्मलेल्या नकोशीला गावाच्या बाजुला भरपावसात रस्त्यावर दिलं फेकून…, धक्कादायक प्रकाराने खेड तालुक्यात खळबळ… ग्रामस्थांनी घडविले माणुसकीचे दर्शन…
महाबुलेटीन न्यूज । सुभाष लोहोट
पाईट : एकीकडे देश भरात स्त्रीशक्तीचा जागर होत असला तरी अजूनही स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या नाही. असाच एक प्रकार खेड तालुक्यातील कोये गावात आज ( दि. १३ ऑगस्ट ) मध्यरात्री घडला. नुकत्याच जन्मलेल्या ‘नकोशी’ ला रस्त्याच्या कडेला रस्त्यावर फेकून दिल्याचे धक्कादायक चित्र आज पाहायला मिळाले.
खेड तालुक्यातील कोये गावालगत नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे उघडकीस आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाजुलाच असणाऱ्या गावातील उषाबाई हिरामण राळे या महिलेला आज पहाटेच्या सुमारास या नवजात बाळाचा आवाज आला. त्यांनी हा प्रकार पोलीस पाटील साहेबराव राळे यांना कळविला. पोलीस पाटील राळे, ग्रामस्थ मानद राळे, उपसरपंच सागर राळे, गोविंद राळे, पोपट राळे गुरुजी यांनी बाळाला प्राथमिक उपचारासाठी पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले. बाळाचे वजन ३ किलो असुन नुकतेच जन्मलेले आहे. हे अर्भक चार तासापूर्वी जन्मल्याचा अंदाज आरोग्य अधिकारी अश्विनी कांबळे यांनी वर्तविला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन चाकण पोलीसांच्या मदतीने बाळाला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस पाटील साहेबराव राळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चाकण पोलीस ‘त्या’ मातेचा शोध घेत आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज । चाकण
जाहिरात व बातमी साठी संपर्क :- 9822364218