अध्यात्मिकपुणे जिल्हाविधायकविशेषहवेली

गावच्या स्मशानभूमी प्रवेशद्वारावर साकारले संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प.. लोकार्पण सोहळा संपन्न.. ● जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांच्यावतीने साकारले अडीच लाखाचे शिल्प..

गावच्या स्मशानभूमी प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प.. लोकार्पण सोहळा संपन्न..
● जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांच्यावतीने साकारले अडीच लाखाचे शिल्प..

महाबुलेटीन न्यूज । सुनील जगताप
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्मशानभूमी प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प साकारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पंचक्रोशी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष रामभाऊ दौंडकर व माऊली तांबे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २९ जुलै ) करण्यात आले.

उरुळी कांचन येथील दानशूर कुटुंब आबासाहेब पाटीलबुवा कांचन, उद्योजक संजय आबासाहेब कांचन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांच्यावतीने उरुळी कांचन भजनी मंडळाच्या आग्रहास्तव सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून गावच्या स्मशानभूमी प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प साकारण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमनाच्या अनुभूतीमधून प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याने हे शिल्प साकारण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी दिली. तसेच या शिल्पाची उत्कृष्ठ निर्मिती उरुळी कांचन येथील गणेश कुंभार यांनी केली आहे. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता संतोष कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, माजी जि.प. सदस्य महादेव कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ह. भ. प. सुरेश कांचन, दीपक कांचन, विनोद कांचन, महादेव (नाना) कांचन, हरिभाऊ डोलारे, घनश्याम जाधव, राजू खेडेकर व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!