सेवा परमो धर्म: अरगडे कुटुंबीयांची गेली 40 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात सेवा
सेवा परमो धर्म: , म्हणजेच सेवा हाच धर्म असे मानून चाकण परिसरातील अरगडे कुटुंबीय गेली 40 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहे. आपल्या वडिलांचा आदर्श आणि वैद्यकीय क्षेत्राबद्दलची निष्ठा डोळ्यासमोर ठेउन डॉ असित अरगडे यांनी 2007 साली मेडिकल प्रॅक्टिस सुरू केली आणि 13 वर्षांपूर्वी अरगडे हॉस्पिटल आणि प्रसूती गृहची निर्मिती झाली , बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हॉस्पिटलमध्ये सोयी करण्यात आल्या आहेत. सुसज्ज खोल्या, आधुनिक तंत्रज्ञान, आणि प्रशिक्षित स्टाफ असा उत्तम समीकरण तयार झाले, डॉ असित अरगडे ह्यांनी जवळपास 8000 प्रसूती यशस्वीपणे केल्या असून, तसेच 3000 हुन अधिक वंध्यत्व रुग्णावर यशस्वी उपचार, 70 % ते 75 % नॉर्मल डिलिव्हरी करणारे डॉ असित अरगडे हे चाकण परिसरातील प्रमुख डॉक्टर आहेत.
नुकतेच या हॉस्पिटल ला National Accreditation Board of Hospital चे entry level Certification प्राप्त झाले असून , ही वाटचाल अशीच सुरू राहील अशा शुभेच्छा!!