२७ वर्षीय युवकाचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन.. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू.. खेड तालुक्यात हळहळ
२७ वर्षीय युवकाचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन..
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पुतण्याचा मृत्यू.. खेड तालुक्यात हळहळ
महाबुलेटीन न्यूज
चाकण : बहुळ ( ता.खेड ) येथील २७ वर्षीय युवक गणेश गोविंदबापू पानसरे यांचे आज ( दि. २८ ) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, चुलते, बहीण, एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई सुखदेव पानसरे व वकील ॲड. सर्जेरावदादा पानसरे व ॲड. सुखदेवतात्या पानसरे यांचे ते पुतणे होत.
००००