युवा क्रांती आयुर्वेदिक काढा’ मोफत वाटपास उत्तम प्रतिसाद
युवा क्रांती आयुर्वेदिक काढा’ मोफत वाटपास उत्तम प्रतिसाद
महाबुलेटिन नेटवर्क । प्रतिनिधी
इंदापूर : क्रांतीदिनाचे औचित्य साधून येथील ‘युवा क्रांती प्रतिष्ठान’च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘युवा क्रांती आयुर्वेदिक काढा’ मोफत वाटपाच्या उपक्रमास लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
दररोज पाचशे ते सातशे जण या काढ्याचा लाभ घेत आहेत.एक महिनाभर हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत सिताप यांनी दिली.
प्रशांत सिताप म्हणाले, कोरोनाविरुध्दच्या सामान्यांच्या लढाईत सामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक मालेगाव पॅटर्न काढा तयार करुन तो नागरिकांसाठी मोफत देण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय युवा क्रांती प्रतिष्ठानने घेतला. या कार्यात जयहिंद व त्रिदल माजी सैनिक संघटना, जय इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग काॅलेज, रचना परिवार, प्रहार दिव्यांग संघटना, इंदापूर सायकल क्लब यांनी स्वेच्छेने सहभाग घेतला. काढा तयार करण्यासाठी लागणारा खर्च उचलण्याची जबाबदारी शहरातील समाजसेवी व्यक्तींनी घेतली.
ऑगस्टला क्रांतीदिना दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत इंदापूर बसस्थानकासमोर, बाबा चौक व संविधान चौकात लोकांना हा काढा देण्यात आला. दररोज सहाशे ते सातशे लोक या काढ्याचा लाभ घेत आहेत. एक महिनाभर दररोज हा उपक्रम चालू रहाणार आहे, असे सिताप यांनी स्पष्ट केले.
———-