यशस्वी होण्यासाठी जिद्द, सातत्य, परिश्रम करणे गरजेचे : संदेश टिळेकर
यशस्वी होण्यासाठी जिद्द, सातत्य, परिश्रम करणे गरजेचे : संदेश टिळेकर
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : यशस्वी होण्यासाठी जिद्द, सातत्य, परिश्रम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संदेश टिळेकर यांनी केले. नवसह्याद्री चॕरिटेबल ट्रस्टच्या वतीने संदेश टिळेकर यांची भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागातील शैक्षणिक विभागात संचालक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, उद्योजक शामराव देशमुख, मच्छिंद्र भुजबळ, जे. जे. जाधव, उत्तम जाधव, जी. ए. जाधव, सुरेश बनकर, डॉ. अमोल ससाणे, डॉ. अपर्णा ससाणे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्ती पिंगळे , सचिव शितल टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक प्रतिनिधी म्हणून रावसाहेब ढेरेंगे, काशीनाथ बिरदवडे, वंशिका व्यास, प्रा. धनंजय रसाळ यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. संतोष बुट्टे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सोमनाथ कसबे, तर आभारप्रदर्शन प्रा. जावेद तांबोळी यांनी केले.
००००