विवाह करण्यापूर्वी एचआयव्ही टेस्ट करणे काळाची गरज : डॉ. एन. जी. ढवळे
संतभारती ग्रंथालयाच्या वतीने गरोदर मातांची एचआयव्ही टेस्ट व फळे वाटप, गरजू महिलांना मास्क व सॅनिटायझर वाटप
महाबुलेटीन न्यूज
चाकण : विवाह करण्यापूर्वी वधू-वरांनी एचआयव्ही चाचणी करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे यांनी केले. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स सप्ताह निमित्त संतभारती ग्रंथालयाच्या वतीने गरोदर मातांसाठी आयोजित केलेल्या एड्स जनजागृती कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयाच्या वतीने एड्स सप्ताह निमित्त गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी करून गरोदर मातांना फळे वाटप तसेच गरजू महिलांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
“संस्कारित व सुदृढ बालकासाठी गर्भसंस्कार करणे आवश्यक असून गरोदर मातांनी चौरस आहार घेणे गरजेचे आहे”, असे प्रतिपादन संतभारती ग्रंथालय व खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी केले.
“एड्स हा आजार दूषित सुई वापरल्याने व विवाहबाह्य लैंगिक संबंधामुळे होत असून एचआयव्ही एड्सवर अद्याप कोणतीही लस नसल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.”
— संतोष नायकोडी ( समुपदेशक, चाकण ग्रामीण रुग्णालय )
यावेळी चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे, समुपदेशक संतोष नायकोडी, संतभारती ग्रंथालयाचे व खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार हनुमंत देवकर, पत्रकार सुनील बटवाल, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील बिरदवडे आदी उपस्थित होते.